Saturday, February 6, 2021

आगडोंब

आजची वात्रटिका
-----------------------

आगडोंब

जी बोंब पेट्रोल-डिझेलची,
तीच गॅसचीही बोंब आहे.
तिघांचाही मिळून मिसळून,
जोरदार आगडोंब आहे.

गॅसने काळवंडलेला,
सामान्य जनतेचा मुखडा आहे !
लवकरच पेट्रोल-डिझेलचा,
शेकड्यामागे शेकडा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7516
दैनिक झुंजार नेता
6फेब्रुवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...