Wednesday, February 24, 2021

यदाकदाचित

आजची वात्रटिका
----------------------

यदाकदाचित

राजकारणाची कोरोनावर,
केंव्हाच मात आहे.
तरी बरे अजून आरोप नाहीत,
यात विरोधकांचा हात आहे.

कोरोना असेल तोपर्यंत,
राजकारण खेळून होईल !!
असे आरोप झाले तर,
कोरोनाही पळून जाईल !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7538
दैनिक झुंजार नेता
24फेब्रुवारी2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...