आजची वात्रटिका
----------------------------
हे प्रबोधनकारांनो...
आमच्या वैचारिक गोंधळावर,
कुणी काही शिकवू नका.
आम्ही आहोत तसे आहोत,
आमच्या भावना दुखवू नका.
रथी-महारथी सांगून गेले,
तुम्हीही तेच पकवू नका.
आहे तेच गोड वाटतेय,
तुम्ही नव्याने शिकवू नका.
पुरोगामीत्वाच्या फुशारक्या,
पुन्हा पुन्हा दाखवू नका.
ठकत आलो,ठकत राहू,
उगीच काही-बाही ऐकवू नका.
मेंदू-बिंदू,तर्क-बिर्क,
नवे विचार चाखवू नका !
तुमचे प्रबोधन तुम्हालाच ठेवा,
आमच्या भावना दुखवू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6052
दैनिक पुण्यनगरी
5फेब्रुवारी2021
No comments:
Post a Comment