Sunday, February 7, 2021

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका
-----------------------
ऑपरेशन फोडाफोडी
पूर्वी अगदी गुपचूपपणे,
राजकीय फोडाफोडी असायची.
कितीही ताणा-ताणी झाली तरी,
गुपचूप ओढाओढी असायची.
आता राजरोस फोडून नेतात,
आता राजरोस काढून नेतात.
ज्यांची इच्छा नाही त्यांनाही,
खुशाल फरफटत ओढून नेतात.
राजकीय संस्कृतीतला हा बदल,
भयावह आणि भीषण आहे !
कसलीही गुंगवा-गुंगवी नाही,
सरळ राजकीय ऑपरेशन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6054
दैनिक पुण्यनगरी
7फेब्रुवारी2021


 

No comments:

daily vatratika....20april2024