Sunday, February 14, 2021

राजकीय प्रेमार्थ

आजची वात्रटिका
----------------------

राजकीय प्रेमार्थ

पक्ष कोणतेही असोत,
त्यांचे अगदी सेम टू सेम असते.
एकमेकांपेक्षा त्यांचे,
फक्त सत्तेवरती प्रेम असते.

कुणाची नियत,
सांगा कुठे साफ असते?
वर त्यांचीच बतावणी,
प्रेम,युद्ध आणि राजकारणात,
सगळेच माफ असते.

सत्तेसाठी कसेही झुलू लागतात,
सत्तेसाठी गुलूगुलू बोलू लागतात!
जशी वेळ असेल तशी,
त्यांचे गुलाब फुलू लागतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6061
दैनिक पुण्यनगरी
14फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...