Sunday, February 14, 2021

वादळी प्रेम

आजची वात्रटिका
----------------------

वादळी प्रेम

सगळी प्रेम प्रकरणं,
मंत्र्या-संत्र्याभोवती
गरागरा फिरू लागले.
जसे काय फक्त मंत्री-संत्रीच,
हल्ली प्रेम करू लागले.

नैतिक असो वा अनैतिक,
ही खाजगी बाब आहे!
त्याचे वादंग माजू नये,
त्यातच प्रेमाची आब आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7524
दैनिक झुंजार नेता
14फेब्रुवारी2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...