Wednesday, February 3, 2021

पोटार्थी

आजची वात्रटिका
----------------------------
पोटार्थी
जिकडे असते सत्ता,
तिकडेच भत्ता असतो.
कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांचा ,
तिकडेच जत्था असतो.
कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे,
उत्तर अगदी सरळसोट असते !
नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनाही,
आपापले पोट असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7513
दैनिक झुंजार नेता
3फेब्रुवारी2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...