आजची वात्रटिका
----------------------
आपली जबाबदारी
कोरोनाच्या साथीबरोबर,
आत्महत्यांची साथ आहे.
नैराश्याच्या गर्तेतून,
प्रत्येकजण जात आहे.
दिलासा आणि बळ द्या,
दिलासा आणि बळ घ्या.
उसने अवसान आणून,
इतरांची कळ घ्या.
बोलते व्हा,बोलते करा,
संकटांना पेलते करा !
सकाराला हाती घेऊन
नकाराला पालथे करा !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
चिमटा-6064
दैनिक पुण्यनगरी
17फेब्रुवारी2021

No comments:
Post a Comment