Friday, February 19, 2021

शिवदर्शन

आजची वात्रटिका
----------------------

शिवदर्शन

शिवबा म्हणजे पराक्रम,
पण फक्त लढाया नाहीत.
शिवबा म्हणजे आक्रमकता,
पण फक्त चढाया नाहीत.

शिवबा म्हणजे गनिमी कावा,
पण फक्त फसवा-फसवी नाही.
शिवबा म्हणजे रंजक इतिहास,
पण फक्त हसवा-हसवी नाही.

शिवबा ऊर्जा,शिवबा उत्साह,
पण फक्त जल्लोष नाही !
शिवबा म्हणजे वास्तवाचे भान,
पण फक्त जयघोष नाही!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7529
दैनिक झुंजार नेता
19फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...