Tuesday, February 2, 2021

अन्यायी बजेट

आजची वात्रटिका
----------------------------
अन्यायी बजेट
हमें पियो और पिने दो,
हे चाललेय ते काय आहे?
कोरोनानंतर बजेटमधूनही,
आमच्या पोटावर पाय आहे.
आत्मनिर्भर भारतासाठी,
आमचा 'देशी उपाय' आहे !
तोच बजेटमध्ये बसणार नाही,
हा अन्याय नाहीतर काय आहे?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6049
दैनिक पुण्यनगरी
2फेब्रुवारी2021

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...