Sunday, February 21, 2021

ट्रेड मार्क

आजची वात्रटिका
----------------------

ट्रेड मार्क

जसे घेता येतील तसे,
फायदे लाटून घेतले.
आपापली दुकाने थाटून,
महापुरूष वाटून घेतले.

प्रत्येकाच्या डोक्यात,
जाती-धर्माचा स्पार्क आहे !
महापुरूषांच्या कपाळी,
आपापला ट्रेडमार्क आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6068
दैनिक पुण्यनगरी
21फेब्रुवारी2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...