Thursday, February 4, 2021

आग ही आग

आजची वात्रटिका
----------------------------

आग ही आग

घाबऱ्या-घुबऱ्या शांततेला,
रोज डाग लावतात इथे.
विझू नयेत ज्वाला म्हणून,
रोज आग लावतात इथे.

बेताल जीभ आपली,
किती सहज घसरवतात इथे?
आगीने आग बघा,
किती सहज पसरवतात इथे.

त्यांचे चालले थैमान जोरात,
सारेच बघे दिसतात इथे !
सारेच जणू पेंगाळलेले,
थोडेच जागे दिसतात इथे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6051
दैनिक पुण्यनगरी
4फेब्रुवारी2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...