Saturday, February 13, 2021

मोबाईल जपून ठेवा

आजची वात्रटिका
----------------------

मोबाईल जपून ठेवा

पुराव्यांची बँक झाला,
मोबाईल जपून ठेवा.
नवरे आणि बायकांनो,
मोबाईल लपून ठेवा.

पुरावे समोर येता,
जो तो गारद आहे.
हल्ली मोबाईल म्हणजे,
कळीचा नारद आहे.

आम्ही देतो इशारे,
इशारे टिपून ठेवा !
कर्तृत्त्व होते व्हायरल,
मोबाईल जपून ठेवा !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6060
दैनिक पुण्यनगरी
13फेब्रुवारी2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...