Monday, February 1, 2021

भाटशाही

आजची वात्रटिका
----------------------------
भाटशाही
पूर्वीही भाट होते,
आताही भाट आहेत.
असे नाही की पूर्वीपेक्षा,
आताचे ताठ आहेत.
कोण कुणाचा ठेवलेला?
ओळखतात ते सुज्ञ आहेत !
हल्लीचे भाट साधे नाहीत,
ते थेट आय.टी.तज्ञ आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6048
दैनिक पुण्यनगरी
1फेब्रुवारी2021

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...