Friday, September 24, 2021

पोट-भेद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
पोट-भेद
विरोधाला विरोध म्हणून,
निवडणुका लढल्या जातात
पोटनिवडणुका असल्या की,
बिनविरोध काढल्या जातात.
राजकीय भाव - भावनांचे,
पोटनिवडणुकीत स्पंदन असते !
घराणेशाहीला लोकशाही,
भावूकतेपोटी आंदण असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7713
दैनिक झुंजार नेता
24सप्टेंबर 2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...