Tuesday, September 21, 2021

राखीव खेळाडू..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

राखीव खेळाडू

केवढी ती प्रचंड तळमळ?
अंगी काय ते स्पिरिट आहे?
भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ,
सोमय्यांच्या माथी 'किरीट'आहे.

भ्रष्टाचाराला आळा तर,
सगळीकडेच बसला पाहिजे!
सोमय्यांसारखा राखीव खेळाडू,
सर्वच टीममध्ये असला पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6270
दैनिक पुण्यनगरी
21सप्टेंबर 2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...