Friday, September 17, 2021

काल सापेक्षता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

काल सापेक्षता

कधी वाटतात डाव पेच,
कधी तीच फंद फितुरी वाटते.
हाती यश आले तर,
तीच राजकीय चतुरी वाटते.

चुकलेला डाव सुद्धा,
कधीकधी सर्वोत्तम ठरला जातो!
एकदा पुरुषार्थ सिद्ध झाला की,
तोच पुरुषोत्तम ठरला जातो !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6267
दैनिक पुण्यनगरी
17सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...