Thursday, September 2, 2021

ज्याचे त्याचे 'उत्तर'दायित्व..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
ज्याचे त्याचे 'उत्तर'दायित्व
सरकारपुढे नेहमीच प्रश्नचिन्ह,
विरोधकांकडे नेहमीच उत्तर असते.
सरकारचे उत्तरदायित्व असूनही,
विरोधकांची भूमिका बेहत्तर असते.
याची त्याला, त्याची याला;
फक्त टोपीवर टोपी असते !
सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधकांची,
भूमिका खरोखरच सोपी असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7692
दैनिक झुंजार नेता
2 सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...