Saturday, September 25, 2021

संरक्षण व्यवस्था...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संरक्षण व्यवस्था

तुमचा मोठा,आमचा छोटा,
दुसऱ्याच्या भ्रष्टाचाराने 
आपला भ्रष्टाचार झाकू लागले.
परस्परांचा एकच दावा,
विरोधक गरळ ओकू लागले.

नकट्याकडून नकट्याच्या
नाकावराच वार आहे !
छोटा काय?मोठा काय?
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6274
दैनिक पुण्यनगरी
25सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...