Saturday, September 11, 2021

देखावे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

देखावे

तोंडापुरतीच तोंड पूजा असते,
फकत तोंडावरती आदर असतात.
जगणे सोपे करण्यासाठी,
देखाव्यांवर देखावे सादर असतात.

बारा महिने तेरा त्रिकाळ,
देखाव्याशिवाय जगता येत नाही !
सतत स्वार्थ आडवा येतो,
म्हणून सरळ वागता येत नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6261
दैनिक पुण्यनगरी
11सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...