Friday, September 3, 2021

गरजवंतांची एकी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गरजवंतांची एकी

पोटार्थी आणि सत्तार्थी यांची,
मंदिरे उघडण्यासाठी एकी आहे.
लोकांच्या भक्तीभावाचा आदर,
ही तर निव्वळ फेकाफेकी आहे.

विद्यालयंपेक्षा देवालये,
त्यांच्या ऐरणीवरचा विषय आहे!
मूलभूत गरजा कोणत्या?
हाच खरा चर्चेचा आशय आहे!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6253
दैनिक पुण्यनगरी
3सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...