Monday, September 13, 2021

भविष्याची सु- रेखा..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भविष्याची सु- रेखा

कारभारी दमानं म्हणण्याची,
खरी आंतरिक ओढ आहे.
लावणीच्या फडाऐवजी,
आता राजकारणाचा फड आहे.

लावणी ते राजकारण,
भविष्याची ही ' सुरेखा ' आहे !
राजकारणाच्या फडात,
आता लावणीचा ठेका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7703
दैनिक झुंजार नेता
13सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...