Saturday, September 4, 2021

चमत्कारिक प्रोत्साहन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चमत्कारिक प्रोत्साहन

हे जगच चमत्कारिक आहे,
रोजच नवे चमत्कार घडू लागले.
खोट्या-नाट्या चमत्काराला,
बिनडोक पुन्हा बळी पडू लागले.

बिनडोक लोकांच्या जीवावरच,
सारे चमत्कार बेतलेले आहेत !
बिनडोकांच्या प्रोत्साहनामुळेच,
चमत्कारकर्ते मातलेले आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6254
दैनिक पुण्यनगरी
4सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...