Wednesday, September 22, 2021

गुड न्यूज?..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गुड न्यूज?

आपल्या हाताने आपली,
नाहक दैना चालू आहे.
मिडीयावाले बातम्या चिवडातात,
कोणत्या नटीला?
कितवा महिना चालू आहे?

बातम्यांकडे बघण्याचे,
ज्यांचे त्यांचे व्ह्यूज आहेत.
इतरांना ज्या बॅड वाटतात,
त्यांना त्याच गुड न्यूज आहेत.

दिवस आणि महिने मोजत,
कसेबसे दिवस काढीत आहेत!
जशी लोकांची भूक आहे,
पानावर तसेच वाढीत आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7711
दैनिक झुंजार नेता
22सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...