Wednesday, September 8, 2021

फरारी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फरारी

फक्त चित्रपटातच शोभावेत,
असे काही थरार आहेत.
कधी आजी, कधी माजी,
चक्क मंत्रीच फरार आहेत.

मोडेल पण वाकणार नाही,
मंत्री सुद्धा करारी आहेत!
राजरोस फिरुन सुद्धा,
ते कागदोपत्री फरारी आहेत!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6258
दैनिक पुण्यनगरी
8सप्टेंबर 2021

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...