Saturday, September 18, 2021

डिझेल म्हणाले पेट्रोलला..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

डिझेल म्हणाले पेट्रोलला

आपल्या स्वस्ताईच्या,
वड्यावर वावड्या आहेत.
महागाईने उडवलेल्या,
जनतेच्या रेवड्या आहेत.

राजकीय कुरघोडीत,
तुझा माझा वापर आहे!
राज्य सरकारच्या माथी,
केंद्राचे खापर आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7708
दैनिक झुंजार नेता
18सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...