आजची वात्रटिका
------------------------
गेल्या घरी सुखी रहा..
विद्रोहाचे उसने सूर,
दिखाऊपणे उगळले गेले.
दाखविता लालूच त्यांना,
किती सहज पघळले गेले.
लाळीचे ओघळ त्यांच्या,
तोंडातून ओघळत आहेत.
कालचे हाडाचे विद्रोही?
आज हाडूक चघळत आहेत.
याचीही जाण नक्की आहे,
कुणाची फितुरी उगाळू नये !
हे सांगणे फक्त यासाठी की,
नाहक विद्रोह डागाळू नये !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6276
दैनिक पुण्यनगरी
27सप्टेंबर 2021

No comments:
Post a Comment