Wednesday, September 8, 2021

मुस्कटदाबी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

मुस्कटदाबी

जेवढे जेवढे असत्य,
सत्याला झाकू लागते.
तेवढे तेवढे सत्य,
बोंबा ठोकू लागते.

जे जे दाबलेले,
ते ते उघडे होवू लागते!
सत्यापुढे असत्य,
नागडे होवू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7696
दैनिक झुंजार नेता
9सप्टेंबर 2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...