Monday, September 6, 2021

खंजीर:एक ब्रँडनेम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

खंजीर:एक ब्रँडनेम

कुणाचे असे!कुणाचे तसे,
वेळोवेळी राजकीय गेम झाले.
म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे,
विश्वासघाताचे ब्रँडनेम झाले.

कुणाचाही आणि कसाही असो,
शेवटी त्याचा गेम तो गेम आहे !
इतिहास वाचून सावध रहा,
वर्तमानाचाही काय नेम आहे?

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6256
दैनिक पुण्यनगरी
6सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...