Tuesday, September 14, 2021

असली-नकली...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

असली-नकली

कधी कधी दाबती गळे,
कशी कधी आंगठे छाटू लागते.
जे जे अभिजात आहे,
ते ते जातीवाचक वाटू लागते.

जे जे अभिजात आहे,
त्याचे त्याचे शास्त्र आहे.
अस्सल प्रतिभा मारण्याचे,
ते जणू राखीव शस्त्र आहे.

अस्सलतेशी टस्सल नको,
आतला आवाज सूर करा!
हिऱ्याला पैलू पाडताना,
आमचे गैरसमज दूर करा !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6264
दैनिक पुण्यनगरी
14सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 176 वा

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 176 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1AkxQn24HJ3lGSkc7m...