Saturday, September 25, 2021

घंटानाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

घंटानाद

विद्यालय की देवालय?
आता कशाला तंटा माजणार?
शाळांची आणि देवळांची,
दोघांचीही घंटा वाजणार.

शाळांत आणि देवळांत,
दोन्हीकडेही घंटानाद असेल!
मूलभूत गरज कोणती?
यावर कायमच वाद असेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7714
दैनिक झुंजार नेता
25सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...