Friday, September 3, 2021

एका शिक्षकाचे दुःख...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
एका शिक्षकाचे दुःख
प्रस्तावाच्या फायली वाहून
माझे पाय झिजले होते
ज्यांनी ज्यांनी मागितले
त्यांना त्यांना मोजले होते,
भिकाऱ्यापेक्षा माझी स्थिती
खरोखरच वाईट होती
आदर्श पुरस्कारासाठी लावलेली
फिल्डिंगही टाईट होती,
देणाराने दिला होता
पण विरोधकाने नेला आहे!
आजपासूनच तयारी करतो
पुढचा शिक्षकदिन कुठे गेला आहे?
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-2341
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर 2010

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...