Friday, September 10, 2021

आरोपांचा विळखा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आरोपांचा विळखा

काही मंत्री आत तर,
काही मंत्री बाहेर आहेत.
विरोधकांचे सत्ताधाऱ्यांना,
आरोपांचे आहेर आहेत.

काही आरोप बिनबुडाचे,
काहींना मात्र बुड आहे!
आरोपांना ठरलेले उत्तर,
हा राजकीय सूड आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7698
दैनिक झुंजार नेता
10सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...