Wednesday, September 1, 2021

घंटा आणि नाद....आजची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घंटा आणि नाद

मंदिरे उघडावीत की नाही?
यावरून जोरदार तंटा आहे.
सरकारचा नकार असला तरी,
विरोधकांच्या हाती घंटा आहे.

राजकीय वादाच्या जोडीला,
आता तर धार्मिक वाद आहे!
विरोधकांबरोबर कोरोनाचाही,
इशारेवजा घंटा नाद आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6251
दैनिक पुण्यनगरी
1 सप्टेंबर 2021

 

1 comment:

Unknown said...

खूप सुंदर 😊👌👌👌

daily vatratika...3april2025