Thursday, September 2, 2021

कायद्याचे राज्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कायद्याचे राज्य

कायदा सुलटाही वापरला जातो,
कायदा उलटाही वापरला जातो.
कायद्याचा वापर करून,
कायदा पद्धतशीर ढोपरला जातो.

कायदा उलटाही पूज्य आहे,
कायदा सुलटाही पूजा आहे!
सगळेच पुन्हा म्हणायला मोकळे,
हे कायद्याचे राज्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7692
दैनिक झुंजार नेता
2 सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...