Wednesday, September 15, 2021

मूकं करोति वाचालम्...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मूकं करोति वाचालम्

कुणाची गाल रंगवायची भाषा,
कुणाचे रंगलेले गाल आहेत.
अंगी 'प्रवीण'ता असली तरी,
तोंडाळपणामुळे हाल आहेत.

वाचाळता गचाळता आहे,
वाचाळतेचे धोके आहेत.
कुणाचे तोंड वासलेले,
कुणाचे मात्र मुके आहेत.

हे सांगायची गरजच नाही,
कुणाची कशी पार्टी आहे?
गढूळलेल्या राजकारणात,
भाजपाची शाब्दिक तुरटी आहे!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6265
दैनिक पुण्यनगरी
15सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...