Saturday, September 18, 2021

वाऱ्यावरची वरात...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

वाऱ्यावरची वरात

सगळ्याच राजकीय शक्यता,
सगळेच तपासून पाहू लागले.
सत्ता बदलाचे बेमोसमी वारे,
मोसमी बनवून वाहू लागले.

विश्वासापेक्षा अविश्वासच,
परस्परांच्या सुरात आहे !
मीडियाच्या खांद्यावरती,
वाऱ्यावरची वरात आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6268
दैनिक पुण्यनगरी
18सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...