Wednesday, September 1, 2021

नम्र प्रार्थना...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

नम्र प्रार्थना

कुणाचा गैरसमज असा की,
कोरोनाबरोबर सरकारचाही,
आपल्यावरती सूड आहे.
सरकारचा आरोग्य उत्सवाचा,
तर विरोधकांचा राजकीय मूड आहे.

धार्मिक भावना पुढे करून,
कुणी वेगळी वाट चोखाळू नये !
जो सर्वव्यापी आहे त्याला प्रार्थना,
कोरोना चेकाळू आणि बोकाळू नये!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7689
दैनिक झुंजार नेता
1 सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...