Sunday, September 26, 2021

छळवाद... आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

छळवाद

कांदे सडले गेले,
सोयाबिन पाडले गेले.
डोळ्यातले स्वप्न,
डोळ्यादेखत खुडले गेले.

वरून कोसळते आभाळ,
खाली धरणी गिळू लागते!
जय जवान जय किसान,
ही घोषणा छळू लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7715
दैनिक झुंजार नेता
26सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...