Monday, September 13, 2021

चिपीचा ट्रेलर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चिपीचा ट्रेलर

विमानाच्या तळावरती,
राजकारण शिजत आहे.
मान-अपमानाचे घोंगडे,
पुन्हा पुन्हा भिजत आहे.
आपला 'पायलट' पणा,
पुन्हा सिद्ध करू लागले!
विमानाच्या पंख्यासारखे,
आमचे डोके गरगरू लागले!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6263
दैनिक पुण्यनगरी
13सप्टेंबर 2021

 

No comments:

DAILY VATRATIKA...27APRIL2024