Sunday, September 5, 2021

शिक्षक दिनाची अपेक्षा..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

शिक्षक दिनाची अपेक्षा

शिक्षक दिनाच्या उत्सवात,
कोण आत्मपरीक्षण करतो आहे?
आदर्श शिक्षक पुरस्कारांभोवती,
शिक्षक दिन फिरतो आहे.

चांगल्याचा सार्थ गौरव व्हावा,
आदर्शाला नवा अर्थ यायला हवा!
एका दिवसाचा सन्मान,
नियमितपणे द्यायला हवा !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6255
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर 2021

 

No comments:

daily vatratika...3april2025