आजची वात्रटिका
----------------------
सोनू आणि सुद बुद्धी
आजच्यासारखा संशयकल्लोळ,
पूर्वी कधीच पाहिला नाही.
सोनूला भरोसा देण्याऐवजी,
त्याच्यावरच भरोसा राहिला नाही.
तुमच्याही आजूबाजूला,
काले धंदे,गोरे लोग असतील.
त्यांची त्यांची नावे आठवा,
ज्यांचेही मदतीचे ओघ असतील.
सामाजिक कार्यामध्ये,
अगदी मनापासून वृद्धी होवो !
एकट्या सोनूवर भरोसा नको!
तुम्हाला-आम्हालाही सुदबुद्धी येवो!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7710
दैनिक झुंजार नेता
21सप्टेंबर 2021

No comments:
Post a Comment