Sunday, September 26, 2021

योगायोग.. आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

योगायोग

आज चॅनल -चॅनल वरती,
पॅनल-पॅनलचा वाद आहे.
आपली सोय,त्यालाच होय,
जणू सर्वांनाच नाद आहे.

कुठे एक, कुठे तीन तीन,
पॅनलसाठी मेंबर आहेत!
सत्ताधारी मेंबरएवढेच
उमेदवारांचे नंबर आहेत!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6275
दैनिक पुण्यनगरी
26सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...