Tuesday, September 7, 2021

आपापली मिरवणूक...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आपापली मिरवणूक

आपल्या दांभिकतेच्या,
कळा तशा खूप नाना असतात.
शक्य असेल तिथे तिथे,
जाती-धर्माच्या खुणा असतात.

आचारा - विचाराचे स्वातंत्र्य जरी,
हे ट्रेडमार्क मिरवले जातात !
संस्कृती संवर्धन म्हणून,
हेच धडे पुढे गिरवले जातात !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6257
दैनिक पुण्यनगरी
7सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...