Thursday, October 8, 2020

गंडोबा प्रसन्न


 आजची वात्रटिका

---------------------

गंडोबा प्रसन्न

आपण पळतोय पुढे पुढे, कोराना मागे मागे पळतो आहे. आपली चाललीय लपाछपी, तो शिवणापाणी खेळतो आहे.

पाच रुपयांच्या मास्कला, आज शेकड्याचा भाव आहे. ही लपाछपी अन छापछापी, हाच खरा लपंडाव आहे .

कोरोनाने मांडलेल्या खेळात, आपला खेळखंडोबा आहे ! जिकडे तिकडे गंडवा-गंडवी, त्यांना प्रसन्न गंडोबा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5938
दैनिक पुण्यनगरी
8ऑक्टोबर2020

No comments:

daily vatratika...3april2025