Sunday, October 11, 2020

राजकीय नियम

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय  नियम

राजकारण हे राजकारण असते,
त्याला स्वतःची गती असते.
त्याला स्वतःची असते दिशा,
त्याची खुर्चीवर प्रिती असते.

राजकारणात जेवढे पुण्य,
तेवढेच पदरात पाप असते !
राजकारण कावेबाजपणे सांगते,
इथे सगळेच माफ असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5941
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर2020
-------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

1 comment:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...