Tuesday, October 20, 2020

किमान अपेक्षा-आजची वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------
किमान अपेक्षा
टीका झाल्या, प्रतिटिका झाल्या,
कोट्यावरती कोट्या झाल्या.
शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा,
टिंगल-टवाळ्याच मोठया झाल्या.
चर्चा जरूर व्हावी;
असे व्ह्यायला हवे आहे,
तसे व्ह्यायला नको आहे !
चुकूनही शेतकऱ्यांच्या दुःखाचे
हसे व्हायला नको आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-5949
दैनिक पुण्यनगरी
20ऑक्टोबर2020

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...