Saturday, October 10, 2020

कोरोनाचा इशारा


आजची वात्रटिका
---------------------------

कोरोनाचा इशारा

मला उल्लू बनवून,
वाट्टेल ते पिल्लू सोडू नका.
भलत्या सलत्या पावत्या,
माझ्या नावे फाडू नका.

माझ्या तंगड्यात,
दुसऱ्याचे तंगडे घालू नका.
माझ्या गळ्यात,
दुसऱ्याचे घोंगडे घालू नका.

जसे नाचायचे आहे,
तसे तुम्ही नाचू शकता !
माझ्याशी पंगा नको,
तरच तुम्ही वाचू शकता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5940
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...