Saturday, October 17, 2020

वक्र दृष्टी


 आजची वात्रटिका

--------------------------

वक्र दृष्टी

कोरोनाचा हैदोस,पावसाचा सोस, सोबत वादळाचीही चक्री आहे. काहीजणांना वाटू लागले, केवळ मंगळ आणि शनी नाही, आख्खी ग्रहमालाच वक्री आहे.

वैतागलेले जीव असे, परिस्थितीला शरण जातात. अंधश्रद्धांच्या बेड्या पडायला, नैसर्गिक संकट कारण होतात.

मंगळ-बिंगळ, शनी-बिनीत असली कसलीच टाप नाही ! लढत आलो,लढत राहू, मानवी इतिहास येडछाप नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7436 दैनिक झुंजार नेता 17ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...