Monday, October 26, 2020

बाजार गप्पा


 आजची वात्रटिका

------------------------------
बाजार गप्पा
बटाटा डोळे वटारीत म्हणाला,
त्या कांद्याच्या नानाची टांग.
पुन्हा कांद्याने चाळीत चाळीत,
गाठली सफरचंदाची रांग.
मिरची ठसक्यात म्हणाली,
तुला तरी बाबा डोळे आहेत.
मी बेंबीच्या देठापासून ओरडते
पण त्यांच्या कानात बोळे आहेत ?
शेपू चुकचूकत म्हणाला,
आमचेही पार वांगे वासले आहे !
दलालांचीच भरती झाल्याने
बळीराजाचे बूड बसले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7443
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!

No comments:

केविलवाणी अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- केविलवाणी अवस्था जिकडे बघावे तिकडे, बंडाळी एके बंडाळी आहे. कुठे खूपसला पाठीत खंजीर, कुठे निष्ठेची ख...